
राज्यात आदिवासी भागांमध्ये होणारे अनधिकृत धर्मांतर रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमित जमिनींवर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे (चर्च) तोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केले.