Mon, Sept 25, 2023

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे
Published on : 9 August 2022, 7:03 pm
मुंबई : विधान परिषदेतील मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी मंगळवारी निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात काल दिलेल्या पत्राला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने मान्यता दिली.
विधान परिषदेत शिवसेनेचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेसचे प्रत्येकी दहा सदस्य आहेत.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्यत्व मिळावे
मुंबई : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी शिवसेना पक्ष म्हणून निमंत्रित केले जावे आणि सल्लागार समितीचे सदस्यत्व दिले जावे, यासाठीचे पत्र शिवसेना गटनेता अजय चौधरी यांनी विधिमंडळ मुख्य सचिवांना दिले.