Devendra Fadnavis Corona positive | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Criticize Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग, ताप आल्याने विश्रांती घेणार

विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांना कणकण होती. काल अकोल्यातील दौरा त्यांनी ताप आल्याने अर्धवट सोडला. तसेच पूर्वनियोजित सोलापूरचा दौरा देखील रद्द करण्यात आला.

यानंतर फडणवीसांनी स्वॅब टेस्टिंगसाठी दिलं होतं. यात त्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला असून कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेच्या निवडणुकीची खलबतं करण्यासाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ आणि सुनील केदार यांचाही समावेश होता. फडणवीस यांना लक्षणं असल्याने त्यांनी टेस्ट केली आहे. मात्र, यामुळे आता अन्य नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. सध्या प्रकती स्थिर असून विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

Web Title: Leader Of Opposition Devendra Fadnavis Found Corona Positive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top