एकेक मत ‘लाख’मोलाचे; विधान परिषदेसाठी आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जयंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा चंद्रपूर गडचिरोली) या सदस्यांची मुदत संपत आहे. या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी उद्या सोमवारी २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे.

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज (सोमवारी) मतदान होत असून, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन जागा राखण्यात यशस्वी होईल असे चित्र असताना, शिवसेनेकडे गमावण्यासारखे काही नाही. 

सहाही ठिकाणी अतिशय चुरशीने निवडणूक होत असून, एका मताला कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त ८ लाख रुपये इतका भाव आल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद, नगरपंचायत या संस्थांतील सुमारे ४ हजार ६२१ मतदार सदस्य पात्र मतदार आहेत.

उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होत असून, या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला.

राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जयंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा चंद्रपूर गडचिरोली) या सदस्यांची मुदत संपत आहे. या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी उद्या सोमवारी २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे.

अशा रंगतील लढती (मतमोजणी २४ मे रोजी)
परभणी-हिंगोली 

सुरेश देशमुख (काँग्रेस) वि. विप्लव बजोरिया (शिवसेना)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) वि. रामदास अंबटकर (भाजप)

नाशिक
शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) वि. नरेंद्र दराडे (शिवसेना)

अमरावती
प्रवीण पोटे (भाजप) वि. अनिल मधोगरिया (काँग्रेस)

उस्मानाबाद-लातूर-बीड
सुरेश धस (भाजप) वि. अशोक जगदाळे (राष्ट्रवादी पुरस्कृत)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) वि. राजीव साबळे (शिवसेना)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: legislative council election in Maharashtra