Post Office : 'लेक लाडकी' योजनेचा लाभ घ्या अन लखपती व्हा; पोस्ट ऑफिसची योजना

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
Post Office Scheme
Post Office Schemeesakal

वेल्हे, (पुणे) - महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या खात्यातून घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण चे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून 'लेक लाडकी' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन एरंडे यांनी केले आहे.

लेक लाडकी या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसन्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसन्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

असा होणार लखपती लाभ

पिकळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस मध्ये घेता येणार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लाभार्थी बालिका व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडणे आवश्यक आहे. याबाबतचा तपशील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्राप्त करता येऊ शकतो.

'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, पोस्ट ऑफिस बचत बैंक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे) लाभार्थीच आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिधिल राहिल.), पालकाचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस बचत बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्लक्रिया प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविकेकडे पोजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर सदर अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.

तरी जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com