राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटल

lemon
lemon

औरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर
औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ६ ऑगस्टला लिंबांची आवक २२ क्विंटल, तर दर ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल होते. ८ ऑगस्टला १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ९ ऑगस्ट रोजी आवक १७ क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १० ऑगस्ट रोजी १३ क्विंटल आवक होऊन ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ११ ऑगस्ट रोजी लिंबांची आवक २३ क्विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ ऑगस्ट रोजी लिंबांची आवकच झाली नाही, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

पुण्यात ४० ते १२० रूपये प्रतिगोणी
पुणे -  कोरोनच्या टाळेबंदीचे परिणाम शिथिलतेनंतर देखील कायम आहेत. हॉटेल, खानावळी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याने लिंबांची मागणी कमीच आहे. यामुळे लिंबांचे दर कमीच  आहेत. साधारण १५ ते २० किलोच्या गोणीला ४० ते १२० रुपये दर पुणे बाजार समितीमध्ये आहेत.  

लिंबांच्या आवक आणि दराबाबतची माहिती देताना प्रमुख आडतदार रोहन जाधव म्हणाले,''सध्या बाजारात दररोज दीड ते २ हजार गोणी आवक होत आहे. तर, प्रति गोणीला ४० ते १२० रुपये दर आहेत. कोरोना टाळेबंदीनंतरही अद्याप शहातील छोटी मोठी हॉटेल, मिसळ गृहे, आणि खानावळी बंद असल्याने लिंबाला मागणी कमी आहे. यामुळे आवक होऊन सुद्धा कमी दराने लिंबाची विक्री होत आहे.''

नांदेडमध्ये ८०० ते १०००  रूपये क्विंटल
नांदेड - नांदेड येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१३) लिंबांची २० क्विंटल आवक होती. लिंबांना प्रतिक्विंटलला ८०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून लिंबांची आवक होत आहे. संचार बंदीमुळे मार्केट बंद राहू लागल्याने गेल्या काही आठवड्यापासून लिंबांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात थोडी तेजी आली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी सरासरी २० ते २५ क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटलला सरासरी ६०० ते १००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१३) लिंबाची २० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला ८०० ते १००० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिनग दोन ते अडीच रुपये प्रमाणे सुरु होती, असे व्यापारी हानीफ बागवान यांनी सांगितले.

नागपुरात १२०० रुपयांना क्विंटल 
नागपूर - गेल्यावर्षी याच दरम्यान चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल असे दर असलेल्या लिंबाला यावर्षी मात्र हजार ते बाराशे रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे. 

२०१९ मध्ये पाच ऑगस्टला ३००० ते ४००० रुपये क्विंटलने लिंबाचे व्यवहार झाले. त्याच वर्षी १३ ऑगस्टला लिंबाला उच्चांकी ४ हजार ते साडेचार हजार रुपयांचा दर मिळाला.  यावर्षी बाजारात आवक वाढल्याने आणि कोरोनाच्या भितीपोटी ग्राहक नसल्याने दरात मोठी घसरण अनुभवली जात आहे. 

सध्या स्थितीत कळमना बाजार समितीत एक हजार ते बाराशे रुपये इतका अत्यल्प दर लिंबाला मिळत आहे. लिंबाची आवक सुरुवातीला पंधरा क्विंटल होती.  त्यात वाढ होत ती आता वीस क्विंटलवर पोहोचली आहे. बंद असलेला हॉटेल व्यवसाय त्यासोबतच थंड वातावरण, या मुळेदेखील मागणीत घट झाल्याचे सांगितले जाते.

नाशिकमध्ये ३५० ते ६२५ रुपये प्रतिक्विंटल 
नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१२) लिंबांची आवक २९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ६२५ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवार (ता.११) रोजी लिंबूची आवक ४७ क्विंटल झाली. तिला ५०० ते ७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६५० होते. 

बाजार समितीमध्ये गुरूवार (ता.७) ते सोमवार(ता.१०) दरम्यान लिंबूची आवक झाली नाही. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लिंबूची आवक घटल्याचे सांगण्यात आले. मात्र, दरांत सुधारणा नसल्याचे चित्र  आहे.

सांगलीत ३५० ते ४००  रूपयांना गोणी
सांगली - शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. १३) लिंबूची आवक ७० गोणींची आवक झाली. त्यास प्रति गोणीस (एका गोणीत ६०० लिंबू ) ३५० ते ४०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील शिवाजी मंडईत बार्शी, सोलापूर या भागातून लिंबांची आवक होत आहे. सध्या लिंबांची मागणी कमी झाली असल्याचेही व्यापाऱ्यानी सांगितले. बुधवारी (ता. १२) लिंबांची   ६५ गोणींची आवक झाली. त्यास प्रति गोणीस ३५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. 

मंगळवारी (ता. ११) लिंबांची  ७५ गोणींची आवक झाली होती.  त्यांना  प्रतिगोणीस ३०० ते ३५० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. १०) लिंबांची ७० गोणींची आवक झाली. त्यावेळी प्रति गोणीस ३५० ते ४०० रुपये असा दर होता. घाऊक बाजारात लिंबाला दर प्रति शेकडा ८० ते १०० रुपये असा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com