esakal | एसटी सेवेस अल्प प्रतिसाद; पहिल्याच दिवशी अनेक फेऱ्या रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

तब्बल पाच महिन्यानंतर गुरुवारी राज्यात एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत राज्यभरात ८४० बसद्वारे १०९० फेऱ्या झाल्या. त्यामधून ५० टक्के वाहतूक करण्यात आली.

एसटी सेवेस अल्प प्रतिसाद; पहिल्याच दिवशी अनेक फेऱ्या रद्द 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनमुळे बंद पडलेली एसटीची आंतरजिल्हा एसटी सेवा अखेर आजपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांचा या सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. अनेक मार्गांवर प्रवासी नसल्याने फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 

तब्बल पाच महिन्यानंतर गुरुवारी राज्यात एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत राज्यभरात ८४० बसद्वारे १०९० फेऱ्या झाल्या. त्यामधून ५० टक्के वाहतूक करण्यात आली. प्रवाशांअभावी अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने लांब पल्ल्यावरील एसटीच्या उत्पन्नाला फटका बसला. मुंबईतील प्रमुख बस्थानकातुन सातारा, नाशिक, चिपळूण, अलिबाग, पुणे अशा मध्यम-लांब पल्ल्यांच्या फेऱ्या सोडण्यात आल्या. मात्र, या फेऱ्यांमध्येही फारसे प्रवासी नव्हते. मुंबई व ठाण्यातून दिवसाभरात पाच शिवनेरी बस पुण्याकडे रवाना झाल्या. त्यातून फक्त १०० प्रवाशांनी प्रवास केला. तर पुण्याहून केवळ एक शिवनेरी मुंबईत दाखल झाली. त्यामध्ये १८ प्रवासी होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लांब पल्ल्याची सेवा आजपासून ? 
मुंबई, ठाण्यातून जळगाव, औरंगाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लांब पल्ल्याची बस अथवा रातराणी बस सोडण्यात आली नाही. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी बस स्थानक व आगारात चौकशी केली. त्यामुळे कदाचित शुक्रवारपासून (ता. २१) लांब पल्ल्याच्या बस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top