esakal | ‘मराठा आरक्षणावर भक्कमपणे बाजू मांडू’
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha-Kranti-Morcha

‘मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल,’’ असे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले.

‘मराठा आरक्षणावर भक्कमपणे बाजू मांडू’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल,’’ असे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज वरिष्ठ विधिज्ञांसमवेत झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत मंगळवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेतला. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली.