कांदा निर्यातबंदी उठवा! 'फलोत्पादन'चे केंद्राला पत्र; शिल्लक कांद्यामुळे दर गडगडण्याची भिती 

तात्या लांडगे
Monday, 21 September 2020

शिल्लक कांदा अन्‌ आगामी अपेक्षित उत्पादनाची दिली माहिती 
राज्यात यंदा खरीप आणि लेट खरीप, उन्हाळी अशा हंगामात साडेसहा लाख हेक्‍टरपर्यंत कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. त्यातून 120 हून अधिक लाख मे. टन कांदा उत्पादित होणार आहे. दुसरीकडे गतवर्षीचा राज्यात 13 लाख मे. टन कांदा शिल्लक आहे, अशी माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे. शिल्लक कांद्यामुळे दर गडगडण्याची शक्‍यता आहे.
- शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र

सोलापूर : राज्यातील चाळींमध्ये मागच्या वर्षीचा तब्बल 13 लाख मे. टन कांदा पडून आहे. त्यातील बहूतांश कांदा आता खराब होऊ लागला आहे. दुसरीकडे फेब्रुवारी- मार्च 2021 पर्यंत राज्यात आणखी सव्वाशे लाख मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होईल. निर्यात बंदी न उठविल्यास बळीराजाचे नुकसान होईल, त्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे पत्र राज्याच्या फलोत्पादन विभागाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयास पाठविले आहे.

 

राज्यात जून- जुलैमध्ये 82 हजार हेक्‍टवर कांदा लागवड झाली आहे. तर लेट खरीपात 15 सप्टेंबरपर्यंत 23 हजार हेक्‍टरवर कांदा लागवड झाली आहे. तर नोव्हेंबर 2020 पर्यंत पाच लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होईल. दरम्यान, मागच्या वर्षीचा कांदा शिल्लक असून आगामी काळात राज्यात आणखी 120 लाख मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कांद्याचे दर खूपच कमी होतील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने व्यक्‍त केला आहे. बळीराजासमोरील अडचणीत पुन्हा वाढ होऊ शकते, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 21) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवांनी देशातील सर्वच फलोत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी यंदा राज्यातील कांद्याचे क्षेत्र 50 हजारांहून अधिक हेक्‍टर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

शिल्लक कांदा अन्‌ आगामी अपेक्षित उत्पादनाची दिली माहिती 
राज्यात यंदा खरीप आणि लेट खरीप, उन्हाळी अशा हंगामात साडेसहा लाख हेक्‍टरपर्यंत कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. त्यातून 120 हून अधिक लाख मे. टन कांदा उत्पादित होणार आहे. दुसरीकडे गतवर्षीचा राज्यात 13 लाख मे. टन कांदा शिल्लक आहे, अशी माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे. शिल्लक कांद्यामुळे दर गडगडण्याची शक्‍यता आहे.
- शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र

 

फलोत्पादन विभागाची माहिती... 

  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीतून 17 हजार 338 हेक्‍टरवर फळबागांची लागवड 
  • रोजगार हमी योजनेतून विविध पिकांसाठी हेक्‍टरी 69 हजार ते अडीच लाखांपर्यंत मिळते मदत 
  • खरीप हंगामात राज्यातील 82 हजार हेक्‍टवर, तर लेट खरीपात 23 हजार हेक्‍टरवर झाली कांद्याची लागवड 
  • नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पाच लाख हेक्‍टरवर होईल उन्हाळी कांद्याची लागवड 
  • राज्यात आगामी काळात सव्वाशे मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होणार असल्याने दर कमीच राहतील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lift onion export ban! Letter to the Center for Horticulture; Fear of falling prices due to remaining onions