आयपीएस सेवेतील सिंह जेव्हा बनतो धूर्त कोल्हा; माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडेंचा टोला

suresh khopade
suresh khopade
Updated on

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रानं राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र माध्यमांसमोर आल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांपासून शरद पवारांच्या स्पष्टीकरणापर्यंत अनेकांनी यावर भाष्य केलं आहे. त्यातच आता माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी देखील यावर सविस्तर भाष्य केलं आहे. "आयपीएस सेवेतील सिंहाची पिंजऱ्यात अडकलेल्या धूर्त कोल्ह्यासारखी धडपड सुरु आहे," अशा शब्दांत खोपडे यांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याची प्रत माध्यमांमध्ये जाईल याची सोय केली आणि देशभर एक हवा निर्माण केली, असं विश्लेषण करता माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 
 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण उचलून धरलं असून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. परमबीर सिंग यांनी पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केल्याने देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारविरोधात भाजपाने आंदोलनही सुरु केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आणि परमबीर सिंग यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. तसेच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत अधिक बोलणं टाळलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com