पहिल्यांदाच आमदार अन् कॅबिनेट मंत्री झालेल्या आदित्य ठाकरेंकडे 'हे' खाते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 January 2020

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाची धुरा साेपविण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाची धुरा साेपविण्यात आली आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून आमदार झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. खातेवाटपाला उशिर होत असलेल्या सरकारबाबत अनेक उलट-सुलट चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र, आज अखेर हे खातेवाटप जाहीर झालं आहे आणि या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातील कोणीही आजपर्यंत मंत्रीपद स्वीकारले नव्हते, परंतू यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले तसेच आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण खाते स्वीकारले आहे.  

तसेच ठाकरे घराण्याचे वारसदार आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन अशी दोन खाती दिल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सुभाष देसाई यांच्यावर उद्योग खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे...

उद्धव ठाकरे : मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन
अजित पवार : उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन
शिवसेना

एकनाथ शिंदे : नगरविकास, सार्वजनिक बांधकाम
सुभाष देसाई : उद्योग
संजय राठोड : वने
शंकरराव गडाख- जलसंधारण
अनिल परब - परिवहन, संसदीय कामकाज
उदय सामंत : उच्च तंत्रशिक्षण
आदित्य ठाकरे : पर्यटन, पर्यावरण
दादा भुसे : कृषी
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
संदिपान भुमरे : रोजगार हमी
शंभुराजे देसाई : गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री
बच्चू कडू : जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री
राजेंद्र यड्रावकर - आरोग्य, सांस्कृतिक, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल देशमुख : गृहमंत्री
छगन भुजबळ : अन्न नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : राज्य उत्पादन शुल्क, कामगार
धनंजय मुंडे : सामाजिक न्याय
नवाब मलिक : अल्पसंख्याक
बाळासाहेब पाटील : सहकार
जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण
राजेश टोपे : आरोग्य
राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ : ग्रामविकास
दत्ता भरणे : जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री
अदिती तटकरे : उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
संजय बनसोड : पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे : नगरविकास, ऊर्जा, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री.
काँग्रेस

बाळासाहेब थोरात : महसूल
अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत : ऊर्जा
वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण
के.सी. पाडवी : आदिवासी विकास
अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
विजय वडेट्टीवार : मदत-पुनर्वसन, ओबीसी, खार जमीन
यशोमती ठाकूर : महिला बालविकास
अस्लम शेख : बंदर विकास, वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन
सुनिल केदार : दुग्धविकास आणि पशुसंवर्धन
सतेज पाटील : गृह राज्यमंत्री (शहरे)
विश्वजित कदम : कृषी, सहकार राज्यमंत्री.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: list of ministers accounts to the governor waiting for official account announcement