थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ हजार शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सध्या या शेतकऱ्यांची यादी बँकेने शासनाकडे अपलोड केली असून, या शेतकऱ्यांकडे सुमारे १२५ कोटींची थकबाकी आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनीदेखील त्यांच्याकडील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत.
mantralay

mantralay

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ हजार शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सध्या या शेतकऱ्यांची यादी बँकेने शासनाकडे अपलोड केली असून, या शेतकऱ्यांकडे सुमारे १२५ कोटींची थकबाकी आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनीदेखील त्यांच्याकडील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे.

थकबाकीदार व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येत आहे.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व खासगी बँकांनी निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे अपलोड केल्या आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम वितरित होईल, असे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे अपलोड केली आहे. राज्य शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीची रक्कम कर्जाच्याच खात्यात जमा होईल.

- कुंदन भोळे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर

...म्हणून ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ

कर्ज घेतलेल्या दिनांकापासून ३६५ दिवसांत कर्जाची रक्कम बँकेत परत भरावीच लागते; अन्यथा ते शेतकरी थकबाकीत जातात. आर्थिक वर्षात कर्जाच्या परतफेडीची शेवटची मुदत ३० जूनपर्यंत असते. आता ३० जूनची मुदत दोन दिवसांनी संपणार आहे. राज्य शासनाने कर्जमाफीसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकीदार शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात लाभाची रक्कम वितरित होऊ शकते, असे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mantralay
OLD AGE PENSION
mantralay
शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay
Marathi News Esakal
www.esakal.com