अमरावती - शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पशुधन अभियान राबविले जाते. या अंतर्गत शेळी, वराह, कुक्कुटपालनासोबतच चारा निर्मिती प्रकल्पाला ५० टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र मार्च महिन्यात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांकरिता अद्यापही निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.