Sudhir Mungantiwar : शेतकरी कर्जमाफीसाठी घाबरता का?

अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
sudhir mungantiwar
sudhir mungantiwarsakal
Updated on

अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कर्जमाफीसाठी घाबरता का, करा ना धाडस,’ असे आवाहन करीत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुनगंटीवार यांच्याकडून सतत सरकारला धारेवर धरले जात असल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

मंगळवारी विरोधी पक्षातील भास्कर जाधव, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, रोहित पवार यांनी सरकारला लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, शक्तिपीठ महामार्ग यावरून सरकारला चांगलेच घेरले. आज सत्ताधारी पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनीच सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून फटकारल्याचे पाहायला मिळाले.

ते म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे. त्यासाठी ८६ हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? या कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपये लागणार आहेत. धाडस दाखवा.’’कर्मचारी वेतन आणि निवृत्ती वेतनावरील वाढीसाठी एक वर्षात सुमारे ३० हजार कोटी खर्च करतो. मग शेतकरी कर्जमाफी करण्यास अडचण काय, अशी विचारणा त्यांनी केली.

तुझसे नाराज नहीं...

मुनगंटीवार म्हणाले, की मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केले नाही म्हणून नाराज आहे. मात्र यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं,’ या गाण्याच्या ओळी म्हणत त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.

तरतुदीत राष्ट्रवादीचा ‘स्ट्राइक’ उत्कृष्ट

‘अर्थसंकल्पात निधीचे वितरण पाहिले असता भाजपच्या खात्यांसाठी ८९ हजार २८ कोटी रुपये, राष्ट्रवादी काँग्रेसकडील खात्यांना ५६ हजार कोटी तर शिवसेनेसाठी ४१ हजार ६०६ कोटींची तरतूद केली आहे. एकूणच अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसचा निधी बाबतचा ‘स्ट्राईक रेट’ चांगला आहे,’ असा टोला काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी लगावला. शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com