Lok Sabha Result 2024: शिंदे गट अन् ठाकरे गट 'एवढ्या' ठिकाणी होते समोरासमोर; कोण जिंकलं? कोण पडलं?

Lok Sabha Result 2024: देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. तर राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. काल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे निकाल समोर आहे.
Lok Sabha Result 2024
Lok Sabha Result 2024Esakal

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. तर राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. काल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे निकाल समोर आहे. राज्यात पक्षफुटी झाल्यानंतर आणि मोठ्या घडामोडी घडल्यानंतर राज्यासह देशात ही मोठी निवडणूक झाली आहे. राज्यातील या ४८ जागापैकी १३ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली.

१३ जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुकाबला झाल्याचे पाहायला मिळाले. तर या १३ जागांपैकी ६ जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून आले आहेत. तर इतर ७ जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.

शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदारांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पुढे निवडणूक आयोगाने शिंदेंच्या शिवसेनेला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दिलं.

Lok Sabha Result 2024
Devendra Fadnavis : ''मला मुक्त करा'', फडणवीसांचा राजकीय बॉम्ब, लोकसभेच्या वाताहतीनंतर उगारलं राजीनामास्त्र

त्यानंतर आता झालेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेना फुटीचा फटका बसेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अशातच एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटापैकी शिंदे गटाचे ७ उमेदवार जिंकले आहेत, तर ठाकरे गटाचे ६ उमेदवार जिंकले आहेत.

कोणती शिवसेना कोणत्या जागांवर जिंकली?

बुलढाणा - शिवसेना(शिंदे गट)

यवतमाळ-वाशिम- शिवसेना(ठाकरे गट)

नाशिक- शिवसेना शिवसेना (ठाकरे गट)

औंरगाबाद- शिवसेना(शिंदे गट)

हिंगोली- शिवसेना (ठाकरे गट)

Lok Sabha Result 2024
Loksabha Election Result 2024: देशात पुन्हा मोदी 3.0? इंडिया आघाडी मोठा डाव टाकणार?

कल्याण - शिवसेना(शिंदे गट)

ठाणे - शिवसेना(शिंदे गट)

दक्षिण मध्य मुंबई - शिवसेना(ठाकरे गट)

उत्तर पश्चिम मुंबई - शिवसेना(शिंदे गट)

दक्षिण मुंबई -शिवसेना(ठाकरे गट)

मावळ - शिवसेना(शिंदे गट)

हातकणंगले- शिवसेना (शिंदे गट)

शिर्डी - शिवसेना(ठाकरे गट)

Lok Sabha Result 2024
Porsche Crash Case: अपघातानंतर बदललेलं ते ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच; धक्कादायक माहिती आली समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com