Eknath Shinde Candidate List : कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक, बुलडाण्यात संजय गायकवाडांनी अर्ज भरला, पण तिकीट जाधवांना; शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर

Shiv sena Candidate First List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal

Shiv sena Candidate First List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

शिवसेनेचे आठ उमेदवार

  1. मुंबई दक्षिण मध्य- राहुल शेवाळे

  2. कोल्हापूर - संजय मंडलिक

  3. शिर्डी - सदाशिव लोखंडे

  4. बुलडाणा- प्रतापराव जाधव

  5. हिंगोली- हेमंत पाटील

  6. मावळ- श्रीरंग बारणे

  7. रामटेक- राजू पारवे

  8. हातकणंगले- धैर्यशील माने

बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

संजय गायकवाड यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज पक्षाकडून भरल्याची माहिती आहे. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आता पक्षाने पुन्हा विद्यमान आमदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये खुद्द श्रीकांत शिंदे यांचं नाव नाही. जाहीर केलेल्या यादीमधील साज जण हे विद्यमान खासदार आहेत, हे विशेष.

‘रामटेक’ मध्ये कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून आयात करण्यात आलेल्या राजू पारवे यांना शिंदे गटाने उमेदवारी देऊ केली आहे. वाशीम- यवतमाळ, कल्याण, नाशिक या जागांसाठीचे उमेदवार मात्र जाहीर करण्यात आलेले नाहीत.

नाशिकवरून महायुतीमध्ये अजूनही चर्चा सुरू असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी बुधवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com