
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की या पाच लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत दिले नाही. ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा असल्याचे मानले जाते.
राज्यात ‘नोटा’ला पाच लाख मते
मुंबई - राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की या पाच लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत दिले नाही. ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा असल्याचे मानले जाते.
राज्यात चार टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान झाले. यामध्ये भाजपला २३, शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा सफाया होताना केवळ एकमेव जागा मिळाली आहे. मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपला २७.६ टक्के (१ कोटी ४९ लाखांहून अधिक) मते मिळाली. शिवसेनेला २३.३ टक्के (१ कोटी २५ लाख ८९ हजारांहून अधिक) मते मिळाली. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला १६.३ टक्के (८७ लाख ९२ हजारांहून अधिक), तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५.५ टक्के (८३ लाख ८७ हजारांहून अधिक) मते मिळाली. इतरांना १४.६ टक्के (७८ लाख ६५ हजारांहून अधिक) आणि ‘नोटा’ला (४ लाख ८८ हजारांहून अधिक) मतदान झाले आहे.
Web Title: Loksabha Election Results 5 Lakh Voting Nota State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..