लोणार: शहारातील बसस्थानकात २२ डिसेंबर २०२४ रोजी अनोळखी व्यक्ती झोपलेल्या स्थितीमध्ये दिसून आला असता लोणार बसस्थानक वाहतूक नियंत्रक संजय राठोड यांनी १०८ वर फोन करून सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. .लोणार ग्रामीण रूग्णालयात सदर व्यक्तीला भरती करण्यात आले. त्यांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यांनतर सदर व्यक्तीला बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचे डॉक्टरानी सांगितले. मात्र सदर व्यक्तीसोबत घरचे नातेवाईक नसल्याने त्यांना एकटे पाठवणे जमत नसल्याने डॉ. फिरोज शहा यांनी या बाबतची माहिती लोणार पोलिसांना दिली. सदर व्यक्तीला लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. सदर व्यक्ती हे बिडी ओढत असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील कर्मचारी यांनी त्यांना बिडी ओढू नकोस सांगितले होते अशी माहिती डॉ. फिरोज शहा यांनी सांगितली..रात्रीच्या वेळेस कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षक उद्धव वाटसर यांना २३ डिसेंबर २०२४ च्या पहाटे ३ वाजून २० मिनिटे वाजे दरम्यान रुग्णाच्या वार्डातून धूर निघत असल्याचे दिसून आले. सदर कर्त्यव्यावर असलेल्या वाटसर यांनी तात्काळ रुग्णालयातील संबधितांना याबाबत कळविले व ब्रदर विष्णू खरात यांनी वार्डातील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्र्तीच्या बेडला आग लागून सदर व्यक्ती जळत असल्याचे त्यांना दिसून आले. आग विझवण्यापर्यंत सदर व्यक्ती जळून मृत्यू पावले होते. सदर आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही..या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, तहसिलदार भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंत्यविधी करण्यात आला.सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी यावेळी ग्रामीण रूग्णालयात पाहणी केली. यावेळी तहसिलदार भूषण पाटील, पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले हे उपस्थित होते. सदर घटनेबाबत लोणार पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, नितिन खरडे करीत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या मर्गावरून सदर व्यक्तीचे नाव हरिभाऊ बापुजी रोकडे अंदाजे वय ६५ वर्ष राहणार पैठण असल्याची माहिती मिळाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.