हृदयविकाराचे मृत्यू रोखणारा स्टेमी प्रकल्प हरवला

हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला की, किंवा रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये अडथळा निर्माण झाला की, हृदयविकाराचा झटका येतो
हृदयविकाराचे मृत्यू रोखणारा स्टेमी प्रकल्प हरवला
sakal

नागपूर : हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला की, किंवा रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये अडथळा निर्माण झाला की, हृदयविकाराचा झटका येतो. विशेषतः ह्दयविकारामुळे होणाऱ्या मृत्युचा टक्का वाढला आहे. पूर्वी साठीनंतर येणारा हृदयाचा झटका तीशीत येत आहे. हृदय विकाराने होणारे मृत्यू काही प्रमाणात रोखण्यासाठी "स्टेमी' हा प्रकल्प राबवण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र प्रकल्पाची अंमलबजावणी झालीच नाही. हा प्रकल्प हरवला आहे.

हृदयविकाराचे मृत्यू रोखणारा स्टेमी प्रकल्प हरवला
देशभर सर्व्हे : कोरोनाच्या परिणामाची गोळा केली जातेय आकडेवारी

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना "गोल्डन अवर'मध्ये उपचार देण्यासाठी पहिल्या टप्प्यात नागपूरसह राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये हा स्टेमी प्रकल्प’ सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. राज्यात कोरोनरी आर्टरी आजारामुळे ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो.

त्यामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात (गोल्डन अवर) औषधोपचार करुन मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट स्टेमी प्रकल्पाच्या माध्यमातून गाठण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा येथे यात राबविण्यात येणार होते. या प्रकल्पामध्ये स्पोक व हब हे मॉडेल वापरण्यात येणार होते. यासंदर्भात नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात माहिती घेतो, नंतर सांगतो असे सांगितले तर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आमच्या दृष्टीने हा प्रकल्प सुरू झाला आहे. काही ठिकाणी अडचणी आल्या असल्यास त्या ठिकाणावर हा प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात ‘स्पोक’

"स्पोक'मध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश आहे. त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी उपचाराच्या अतितत्काळ सेवा दिल्या जाणार होत्या. राज्यात ११० ठिकाणी स्पोक स्थापन करण्यात येतील. यात दोन खाटांचा अतितत्काळ विभाग सुरु करण्यात येणार होता. त्याठिकाणी ईसीजी यंत्रावर तत्काळ ईसीजी काढला जाईल.

तंत्रज्ञानाच्या मदतीने क्‍लाऊड कनेक्‍टिव्हीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचाराबाबत दहा मिनिटांच्या आत मार्गदर्शन केले जाईल. स्पोकमध्ये रुग्णांचा ईसीजी करुन हृदयविकाराचा झटका आला की नाही याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्रॉंबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर रुग्णाला "हब' मध्ये रेफर करण्यात येईल.

"हब'मध्ये हृदयरोग तज्ज्ञ

हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश ‘हब’ मध्ये असणार आहे. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेले खासगी रुग्णालये यांचाही समावेश येथे स्टेमी प्रकल्पातील हबमध्ये करण्यात येईल. राज्यात २७ हब असतील. या हबमध्ये शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार होते. मात्र अद्यापही या स्टेमी प्रकल्पाला दिशा मिळाली नसल्याने हा प्रकल्प फाईल बंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com