शेअर मार्केटमध्ये हरला अन्‌ मित्रासोबत चोरीचा नाद लागला! नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करणारे दोघे जेरबंद, सोलापूर शहर क्राईम ब्रॅंचची कामगिरी

सोलापूर शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिसही चोरट्यांच्या मागावर होतेच. त्यावेळी कर्नाटकातील दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन गंगामाई हॉस्पिटलजवळ थांबल्याची खबर पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथक तेथे पोचले आणि दोघांनाही पकडले.
solapur city crime

solapur city crime

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या दोन मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. सुरवातीला काहीसा नफा मिळाल्यावर त्यांनी दीड लाखांहून अधिक रक्कम गुंतवली आणि त्यात त्यांना तोटा झाला. लोकांचे पैसे द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी बनावट चावी तयार केली आणि ४ जानेवारीला सोलापुरात पहिली दुचाकी चोरली. १५-२० दिवसांनंतरही पोलिस आपल्यापर्यंत पोचू शकले नाहीत म्हणून त्यांनी १५ मार्चपर्यंत सहा दुचाकी चोरल्या होत्या. पण, सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना जेरबंद केले आणि त्या दुचाकी हस्तगत केल्या.

सोलापूर शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिसही चोरट्यांच्या मागावर होतेच. त्यावेळी कर्नाटकातील दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन गंगामाई हॉस्पिटलजवळ थांबल्याची खबर पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथक तेथे पोचले आणि दोघांनाही पकडले. त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी एक नव्हे तर सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आता देखील दुचाकी चोरीसाठीच ते सोलापुरात आले होते. त्यांनी दुचाकी चोरीसाठी बनावट चावी तयार केली होती. दोघेजण मिळून दुचाकीवरून यायचे आणि जाताना एक दुचाकी चोरून दोघेही दुचाकीवरून जायचे.

बनावट चावी ज्या दुचाकीला बसेल ती दुचाकी ते चोरत होते. दोन-अडीच महिने त्यांचा अभ्यास करून ७० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून श्री. खेडकर यांच्या पथकाने त्यांना जेरबंद केले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. खेडकर यांच्या पथकाने पार पाडली.

बी.एस्सी. नर्सिंगमध्ये ८८ टक्के गुण, पण...

विजयपूर जिल्ह्यातील अतारगा व आरेकरी या गावातील प्रमोद जेऊर (वय २१) व अमोल चव्हाण (वय २६) हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याने मित्र होते. दोघांचेही बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहेत. प्रमोदला परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले आहेत. त्या दोघांनी मिळून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. काही दिवसांतच त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून प्रमोदने मित्र अमोलला सोबत घेऊन काही दिवसांचे अंतर ठेवून सहा दुचाकी चोरल्या. चोरीच्या दुचाकी विकून त्यांनी लोकांचे पैसे दिले, पण पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आणि दुचाकीही हस्तगत केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com