Lawyer : राज्यातील १४ हजार ६४८ वकिलांना नोटरी पदाची लॉटरी; वकील वर्गात आनंदाचे वातावरण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिली व्यवसाय करणाऱ्यांना नोटरी पदाची लॉटरी लागली आहे.
lawyers
lawyerssakal

मंचर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिली व्यवसाय करणाऱ्यांना नोटरी पदाची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार ६४८ वकिलांची नोटरी म्हणून केंद्र सरकारने गुरुवारी (ता.१४) रात्री नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढ्या संख्येने एकाच वेळी नोटरी पदी नियुक्ती होण्याचा हा उच्चांकच म्हणाव लागेल. वकील वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून वकील यांना ओळखले जाते. ते कायदेशीर व्यावसायिक आहेत. काही कायदेशीर कार्ये करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.

वकिली व्यवसायात पदार्पण केल्या नंतर १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या. मुलाखती देलेल्या जवळपास सर्व वकिलांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. असे नोटरी मोरडे यांनी सांगितले.

रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदेशीर बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहिणे आवश्यकती तिकीटे लावावी लागतात. खेड तालुक्यात ५७ जुन्नर तालुक्यात २६ तर आंबेगाव तालुक्यात १७ जणांची नोटरी पदी वर्णी लागली आहे.

आंबेगाव तालुक्यात सर्वस्वी एडवोकेट विलास गंगाराम शेटे, सुदाम ज्ञानेश्वर मोरडे, आशिष काजळे, नवनाथ निघोट, प्रमोद काळे, दीपक विलास लोहटे, ज्योती खेसे-गुंजाळ, वैशाली बांगर, वर्षा थोरात, प्रशांत मंडलिक, श्रीकांत काळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, नयना पडवळ, लक्ष्मण डामसे, अमित बेल्हवर, विनोद चासकर व ज्योती गणेश शिंदे-भगत यांचा समावेश आहे.

नोटरी पदी नियुक्त झालेल्या आंबेगाव तालुक्यातील सर्व वकिलांचे अभिनंदन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.

'ग्रामीण भागात विविध प्रमाण पत्र व दाखले प्रमाणित करण्यासाठी नोटरी वकिलांची गरज असते. सध्यस्थितीत नोटरी धारक वकिलांची संख्या फारच कमी होती. केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात नोटरी धारक नियुकत्या केल्यामुळे नागरिक, विध्यार्थी व व्यावसायिकांना सोय होणार आहे.'

- अ‍ॅड. प्रमोद काळे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका बार असोसिएशन घोडेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com