माढा मतदारसंघाला दरदिवसाला मिळतो 30 कोटींचा निधी; खासदार निंबाळकरांच्या दाव्याने आश्चर्य

Ranjit Naik-Nimbalkar News
Ranjit Naik-Nimbalkar Newsesakal

मुंबईः माढा मतदारसंघाला दरदिवसाला ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी मिळत असल्याचा दावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, २०१९ नंतर माढा मतदारसंघाला ५० ते ६० हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा विक्रमी स्वरुपात निधी मिळाल्याचं रणजितंसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

हेही वाचाः शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

खासदार निंबाळकर पुढे म्हणाले की, माढा मतदारसंघाला राज्यातून मिळालेला निधी सोडा, खासदारकीचा मिळालेला निधी आणि विकासकामांचा आढावा घेतल्यास दरदिवसाला ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मतदारसंघात झालेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचं ते म्हणाले.

Ranjit Naik-Nimbalkar News
Narendra Modi : गुलाम नबी आझाद मोदींवर बोलले; 'त्यांनी सूडाच्या भावनेतून...'

२०१९नंतर माढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्याचं ते म्हणाले. खासदार रणजितंसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघाला मिळालेल्या निधीवरुन केलेल्या दाव्याचं आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com