महाराष्ट्र : आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढणार; महाबीज परिषदेचा दुबई दौरा

Shripad kulkarni
Shripad kulkarnisakal media

मुंबई : महाराष्ट्रातील व्यावसायिकांना (Maharashtra businessman) दुबई (Dubai) तसेच आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढविण्याची (Business expansion) संधी मिळावी यासाठी महाबीज परिषदेतर्फे (Mahabeej parishad) दुबई दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक तज्ञांचे व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन मिळेल (expert guidance) तसेच तेथील संबंधित उद्योजकांशी संपर्क करता येईल. (Mahabeej parishad visit in dubai for Maharashtra businessman business expansion)

Shripad kulkarni
दहिसर SBI बँक दरोडा: बुटामुळे दरोडेखोर अटकेत, श्वानानं काढला माग

यासंदर्भात ब्रिजमोहन चौधरी, श्रीपाद कुलकर्णी यांनी बुधवारी येथे वरील माहिती दिली. 17 ते 22 फेब्रुवारीदरम्यान हा दौरा होईल. आखाती देशातील व्यवसाय संधी, परदेश व्यापारातील अडचणी याबाबत तज्ञ अतुल ठाकूर माहिती देतील. तर महिला उद्योजकांना श्वेता इनामदार मार्गदर्शन करतील. आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रेझेंटेशन कसे करावे, आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांशी नेटवर्किंग आणि व्यवसायसंधी आदींबाबत अतुल ठाकूर या परिषदेत मार्गदर्शन करतील.

सध्याचे दुबई एक्स्पो 31 मार्चपर्यंत सुरु असून फेब्रुवारीत तेथे गल्फ फूड फेअर भरणार आहे. तसेच 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तेथे महाबीज बिझनेस कॉन्फरन्स होणार आहे. जीएमबीएफ ग्लोबल तर्फे तिचे आयोजन केले जाईल. आखाती देशातील उद्योजक व व्यावसायिकांनी स्थापन केलेली ही संस्था असून मराठी व्यायवसायिकांना आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढवता यावा यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून काम करीत आहे. या संस्थेचे 500 पेक्षा जास्त सभासद आखाती, मध्य पूर्व, आफ्रिकन देशात आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाबीज बिझनेस कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या राज्यातील कित्येक उद्योजकांना आखाती देशात व्यवसाय वाढीची संधी मिळाली, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

या परिषदेत आखाती देशांमधील उद्योजक-व्यावसायिक येतील, त्यांची व महाराष्ट्रातील उद्योजकांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. तेथील ज्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातील ज्या मालाची गरज आहे, ते पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा एकमेकांशी संपर्क झाल्यावर व्यवसायवृद्धीची संधी मिळेल. अशी परिषद दर दोन वर्षांनी होते, आखाती देशांमधील व्यावसायिक महाराष्ट्रातील उद्योजकांबरोबर व्यवसाय करण्यास उत्सुक असतात. ती संधी आपण साधायला हवी, त्यासाठी आम्ही मध्यस्थाची भूमिका बजावू, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com