

The Gokul dairy cooperative building in Kolhapur, amid controversy over an alleged plan to make Gokul a multistate cooperative
esakal
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गोकुळला मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा जानकर यांनी केला आहे. मंत्री असताना गोकुळचे खासगीकरण होऊ नये, यासाठी आपण ठाम भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.