
Beed Crime News: बीडच्या परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांना किती निर्घृणपणे मारण्यात आलंय, हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. या घटनेमुळे प्रत्येकजण संताप व्यक्त करतोय. मात्र अजित पवार, जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. त्यांना मात्र या प्रकरणाचं काहीच देणंघेणं नाही, असं दिसून आलं. कारण त्यांनी या प्रकरणात दिलेली पहिली प्रतिक्रिया असंवेदनशीलपणाचा कळस आहे.