
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा खरंतर गुन्हेगारीनं कसा माखलेला आहे, हे मागील काही काळापासून संपूर्ण राज्य काय तर देशही पाहतोय. महाराष्ट्रातही यूपी-बिहारसारखी गुन्हेगारी वाढल्याची चर्चा झाली. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवरुन खरंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात आलं. अशातच बीडमधलंच महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलंय. तेही दिवसेंदिवस खळबळजनक गोष्टी समोर येताहेत. बाळा बांगर जे खरंतर एकेकाळी वाल्मिक कराडचे जुने सहकारी होते तेच आता या प्रकरणात धक्कादायक दावे करून या प्रकरणातील पीडित ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत उतरलेत. शिवराज बांगरांनीही २ दिवसांपूर्वी याविषयी भाष्य करताना धनंजय मुंडेंचं नाव घेतलं होतं. तरी, महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय?, याची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत? आता हे प्रकरण कुठपर्यंत आलंय, जाणून घेऊया.