‘महानंद’च्या संचालकपदी केशर पवार यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keshar Pawar

पश्चिम महाराष्ट्रातून पवार यांची महानंदच्या संचालकपदी निवड झाली आहे. मागील सुमारे अठरा वर्षांपासून केशर पवार या पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळात आहेत.

Mahanand Milk : ‘महानंद’च्या संचालकपदी केशर पवार यांची निवड

पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षा केशर पवार यांची दूध संस्थांची शिखरसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी गुरुवारी (ता.२९) बिनविरोध निवड झाली.

पश्चिम महाराष्ट्रातून पवार यांची महानंदच्या संचालकपदी निवड झाली आहे. मागील सुमारे अठरा वर्षांपासून केशर पवार या पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळात आहेत. सध्या त्या पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. या दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. याआधी त्यांनी जिल्हा दूध संघाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आणि माझी महानंदच्या संचालकपदी निवड केली. या नेत्यांनी टाकलेल्या विश्वासास नक्की पात्र राहू. तसेच राज्यातील दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आणि दुधाला चांगला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर केशर पवार यांनी या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या स्थापनेत पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचा मोठा सहभाग असून, या संस्थेतील सर्वाधिक भाग भांडवल हे पुणे जिल्हा दूध संघाचेच आहे.

टॅग्स :maharashtraMilkDirector