Mahanirmiti Recruitment : ‘महानिर्मिती’च्या भरतीवर अजित पवारांचा आक्षेप; व्यक्त केली 'ही' भीती… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Mahanirmiti Recruitment : ‘महानिर्मिती’च्या भरतीवर अजित पवारांचा आक्षेप; व्यक्त केली 'ही' भीती…

Mahanirmiti Recruitment : महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादरम्यान कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांची भरती दरम्यान अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शुध्दीपत्रक काढण्याची मागणी केली आहे.

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. "महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या जाहिरातीत आरक्षित वर्गाला अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य केलं आहे. परंतू अनारक्षित वर्गाला अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचा उल्लेख नाही" असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jitendra Awhad : शरद पवारांनी केलेल्या कौतुकानंतर आव्हाडांचं 'खास' ट्विट; म्हणाले, "साहेब…"

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता..

अजित पवार पुढे म्हणाले की, "परिणामी या नोकर भरतीत राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘महानिर्मिती’च्या पदभरती प्रक्रियेत सर्वांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचे शुध्दीपत्रक तातडीनं काढण्याची मागणी पत्राव्दारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे."

हेही वाचा: NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? माजी खासदाराने तडकाफडकी सोडला पक्ष