"कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न तयार झाला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे. एखाद्या मंत्र्याच्या आशीर्वादाशिवाय कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार शक्य नाही."
मुंबई : राज्यात पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) बोगस प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी दोषी असणाऱ्या ९६ महा ई-सेवा केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी दिली. तसेच पीक विमा योजना बंद न करता त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.