
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत रमी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते रोहित पवार यांनी केला. मात्र, कोकाटे यांनी हा आरोप फेटाळताना सांगितले की, ते रमी नव्हे, तर सॉलिटेअर हा एकल खेळ खेळत होते. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर काँग्रेसनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.