Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प एका क्लिकवर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे.
Maharashtra Budget 2023 News Updates
Maharashtra Budget 2023 News UpdatesSakal

Maharashtra Budget 2023 Live : महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क

- वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

- ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत

- दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू

- कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ

- कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ

Maharashtra Budget 2023 Live : करप्रस्ताव 

- महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त

- यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये

- दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका

हवाई वाहतुकीला चालना :

एटीएफ मूल्यवर्धित कर 18 टक्के

अर्थकारणाला चालना

- हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाऊल

- बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्क्यांहून आता 18 टक्के

- असे करुन हा कर बंगळुरु आणि गोव्याच्या समकक्ष

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क :

थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

- वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

- ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत

- दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू

- कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ

- कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ

Maharashtra Budget 2023 Live : अर्थसंकल्पानंतर अजित पवार म्हणाले...

वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प, अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. शिवरायांच्या नावाने फक्त घोषण स्मारकाबाबत उल्लेख नाही. अशी टीका अजित पवारांनी केली.

Maharashtra Budget 2023 Live : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे...

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक

- विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके

- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

Maharashtra Budget 2023 Live : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास

- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये

- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये

- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये

- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी

- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी

- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : स्मारकांसाठी मोठी तरतूद 

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार

- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये

- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये

- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये

- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये

- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

.......

Maharashtra Budget 2023 Live : बोलतो मराठी, वाचतो मराठी... माय मराठीच्या सेवेसाठी...

- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन क रणार

- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे

- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

- सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये

- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये

- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये

- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना

- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये

- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा

Maharashtra Budget 2023 Live : शिक्षणसेवकांना भरघोस मानधन

 - प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : शिक्षणासाठी भरीव तरतूद 

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून १ लाख ११ हजार २८५ कोटी इतका खर्च प्रस्तावित केला आहे.

Maharashtra Budget 2023 Live : श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

- श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना; कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा होणार सन्मान

- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी

- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

Maharashtra Budget 2023 Live : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकास

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेतली जातील. यासाठी ३०० कोटींची तरतूद

– भिमाशंकर, पुणे

– त्र्यंबकेश्वर, नाशिक

– घृष्णेश्वर, संभाजीनगर

– औंढ्या नागनाथ, हिंगोली

– वैजनाथ, बीड

Maharashtra Budget 2023 Live : द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये

- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये

- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये

- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये

- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये

- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये

- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये

- कामगार विभाग : 156 कोटी रुपये

>> द्वितीय अमृत योजनेसाठी एकूण : 43,036 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : पर्यटनाला चालना...

- प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण

- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास

- 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार

- राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

Maharashtra Budget 2023 Live : सशक्त युवा.... खेळांना प्रोत्साहन

- खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध

- बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार

- पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार

- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान

- नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live :  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अपराधसिद्धतेत वाढीसाठी....

- न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण

- न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार

- 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट

- मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार

- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प

- राज्यात दोन नवीन कारागृह

- देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह

- 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये

Maharashtra Budget 2023 Live : राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा

- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे

- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

- मुंबई विद्यापीठ

- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन

- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान

- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार

- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत

- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार

- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

Maharashtra Budget 2023 Live : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

Maharashtra Budget Live 2023 : जलयुक्त शिवार 2.0 योजना 

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

- जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये

- गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ

Maharashtra Budget 2023 Live : हर घर जल: जनजीवन मिशन

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये

- 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प

- 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी

- 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया

- 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने

- ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

Maharashtra Budget 2023 Live : इतर मागासवर्गीयांसाठी 'मोदी आवास घरकुल योजना'

- प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये

(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी

(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

Maharashtra Budget 2023 Live : रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण

- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी

- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये

- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार

- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल

- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी

Maharashtra Budget 2023 Live
Maharashtra Budget 2023 Livesakal

Maharashtra Budget 2023 Live :  विमानतळांचा विकास

- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी

- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार

- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी

- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

Maharashtra Budget 2023 Live : संजय गांधी निराधार योजना 

- अंत्योदयाचा विचार

- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार

- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

Maharashtra Budget 2023 Live : शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना

- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना

- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा

- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ

- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप

- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी

- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

Maharashtra Budget 2023 Live : मुंबईचा सर्वांगिण विकास

- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये

- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण

- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये

- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी

Maharashtra Budget 2023 Live
Maharashtra Budget 2023 Live sakal

Maharashtra Budget 2023 Live : विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ

- विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

Maharashtra Budget 2023 Live : शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

- राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार

- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)

- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे

Maharashtra Budget 2023 Live : सारे काही महिलांसाठी

- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत

- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर

- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

Maharashtra Budget 2023 Live
Maharashtra Budget 2023 Live sakal

Maharashtra Budget 2023 Live : विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार

- संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार

- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये

नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार

- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ

- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ

- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत

- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

Maharashtra Budget 2023 Live : सर्वांसाठी घरे...यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

  • इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’

  • प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

  • (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

  • रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये

  • (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

  • शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी

  • (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

  • इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये

  • (या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये)

  • असंघटित कामगार/कारागिर/टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी...

  • 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार

  • ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

  • माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी

  • स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

Maharashtra Budget 2023 Live : पायाभूत सुविधा... समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग....

- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता

- पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)

(माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)

- या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ

Maharashtra Budget 2023 Live : द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग

द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग,

ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

विभागांसाठी तरतूद

- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये

- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये

- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये

- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये

- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये

- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये

- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये

- कामगार विभाग : 156 कोटी रुपये

द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

- कृषी विभाग : 3339 कोटी रुपये

- मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये

- सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये

- फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये

- अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये

- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये

- जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये

- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये

- मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : रस्त्यांसाठी निधी 

- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद

- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी

- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद

- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी

- हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये

- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये

- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे

- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये

- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.

- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना

- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना

Maharashtra Budget 2023 Live :  आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी

- आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना

- बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना

- धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना

- या तिन्ही योजनांसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live :  मेट्रो प्रकल्प

मेट्रो प्रकल्प....

- मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला

मुंबईतील नवीन प्रकल्प

- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी

- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये

- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये

- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी

- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर

- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो

Maharashtra Budget 2023 Live :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी

- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकास

अर्थसंकल्पात राजकारण होतचं : अजित पवार 

निधी हा विभागानुसार ठरतो, पक्षानुसार नाही. तसेच 83% निधी भाजपच्या मंत्र्यांना मिळतो अशी माहिती abp माझाला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी दिली.

बजेटमध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील : सुधीर मुनगंटीवार 

विरोधकांना बजेट हे कदाचित निराशजनक वाटेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत आज विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.

अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता होणार सादर

आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य जनतेच लक्ष लागले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शहरी भागातील नागरिकांना दिलासा देताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget 2023 News Updates
Maharashtra Budget 2023 : सर्वसामान्यांना बजेटकडून मोठ्या आशा; अर्थमंत्री पूर्ण करणार का 'या' मागण्या?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com