
महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच देशाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. सध्या पावसाळी अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नांपेक्षा अधिवेशनातील राडा आणि मारहाणीच्या घटनांनी जास्त लक्ष वेधले आहे. अनिल परब, शंभूराज देसाई, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाने विधानसभेच्या लॉबीत मारहाणीपर्यंत मजल मारली.
पण, अशी धक्काबुक्की विधिमंडळात पहिल्यांदाच घडली असे नाही. तब्बल चार दशकांपूर्वी, 1982 मध्ये, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या पक्षाच्या आमदारांकडून धक्काबुक्कीचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे, तर त्यांना चप्पल सोडून पळावे लागले होते. हा ऐतिहासिक प्रसंग आणि त्यामागील राजकीय नाट्य याबद्दल जाणून घेऊया.