मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. मात्र २०२२ मधील बंडावेळी शिंदे यांना साथ देणाऱ्या दान अपक्षांसह पाच आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे..शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडा वेळी शिंदे यांना ४० आमदारांनी साथ दिली होती. मात्र त्यापैकी ५ आमदारांवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या ‘हाय होल्टेज’ लढतीमध्ये सदा सरवणकर यांना शिवसेनेच्या (ठाकरे) महेश सावंत यांच्याकडून १,३१६ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला..त्याचबरोबर शहाजीबापू पाटीला यांनाही सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांच्याकडून २५,३८६ मतांनी पराभव पत्करावा लागला. मेहकर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या संजय रायमूलकर यांचा शिवसेना (ठाकरे) उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी ४, ८१९ मतांनी पराभव केल. तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांना उमरगा मतदारसंघामध्ये व यामिनी जाधव यांनाही मुंबईतील भायखळा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला..या अपक्षांचाही पराभवएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडा वेळी साथ देणाऱ्यांमध्ये अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. बच्चू कडू यांनाही या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच २०१९ च्या निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांचाही पराभव झाला आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.