esakal | पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार
sakal

बोलून बातमी शोधा

विधानभवन

पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन (maharashtra assembly monsoon session) सोमवार ५ जुलैपासून मुंबईत होणार आहे. विधानसभेची बैठक सकाळी ११ वाजता तर विधान परिषदेची बैठक दुपारी १२ वाजता सुरू होईल. मराठा, ओबीसींसह पदोन्नतीमधील आरक्षणाचे (obc reservation) विषय गाजण्याची शक्यता आहे. (maharashtra assembly monsoon session starts from 5 july in mumbai)

हेही वाचा: तिरोड्याच्या माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, देशमुखांची घरवापसी

मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक ठरवत रद्द केले. यावरून राज्याचे राजकारण व समाजकारण चांगलेच ढवळून निघाले. मराठा समाजाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. भाजपही यावरून सरकारवर निशाना साधण्याची संधी सोडताना दिसत नाही. मराठासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचाही पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोक्यात आले आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदेतील निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणच नाही तर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचाही प्रश्नही कायम आहे. राज्य सरकारने मागासवर्गीयांसाठी ३३ टक्के पद राखीव न ठेवता सरसकट सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यावर मंत्रिमंडळात खडाजंगी झाली. त्यामुळे हे अधिवेशन आरक्षणाच्या नावे राहणार असल्याचे दिसते.

loading image