'हा काय तबेला आहे का?'' मुनगंटीवार-पटोलेंमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Mungantiwar Nana Patole

''हा काय तबेला आहे का?'' मुनगंटीवार-पटोलेंमध्ये जुंपली

मुंबई : सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) सुरू आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या (Maharashtra Assembly Speaker Election) निवडीचे नियम बदलण्यावर चर्चा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नाना पटोले (Congress MLA Nana Patole) आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. सरकार बेईमान पद्धतीनं आलं, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर पटोलेंनी आक्षेप घेतला.

अध्यक्ष निवडीला एकमत करता येते. आम्ही मोठे हा भाव न ठेवता विरोधी पक्षांशी चर्चा करून अध्यक्ष निवडता आला असता. पण, ते का केलं नाही? असा सवाल मुनगंटीवारांनी विचारला. त्यानंतर घोडेबाजार टाळण्यासाठी आम्ही नियम बदलले. नियम पहिल्यांदा बदलले नाहीत. घोडेबाजार म्हटलं की भाजपला त्रास का होतो? असं नाना पटोले म्हणाले. त्यानंतर मुनगंटीवारांनी सरकार बेईमान पद्धतीनं आलं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेत बेईमान कसं काय म्हणू शकता? असा सवाल केला.

पटोलेंचा आवाज वाढताच मुनगंटीवारांनी नाना पटोलेंवर आवाज चढवला. तुम्ही घोडेबाजार बोलले. आमदारांना घोडेबाजार म्हणायला हा काय तबेला आहे का? तुम्ही आमदारांचा अवमान केला. नाना भाऊ भाजपमध्ये दहा वर्ष राहिले. तुम्हाला भाजपने जे संस्कार दिले ते आता तरी दाखवा, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर पटोलेंनी पहाटेच्या शपथविधीवरून भाजपवर निशाणा साधला. तुम्ही अंधारात सरकार बनवलं त्याला काय म्हणायचं? असा सवाल पटोलेंनी केला.