ही कुठली पद्धत सर्वांचेच लाड… ; अजित पवार भडकले, काय आहे कारण? Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar: ही कुठली पद्धत सर्वांचेच लाड… ; अजित पवार भडकले, काय आहे कारण?

ही कुठली पद्धत झाली? सगळ्यांचे लाड चाललेत लाड सुरु आहेत. अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. ( Maharashtra Assembly Winter Session Ajit Pawar Angry )

विधानसभेत आज सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू असताना अजित पवार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर पुढे आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या पाच क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा होणं अपेक्षित होतं.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या लक्षवेधीवर उत्तर अपेक्षित होतं. मात्र, गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली यावरुन अजित पवार चांगलेच भडकले.

हेही वाचा: Live Update: राज्यपाल झाले भाज्यपाल; विधानभवन परिसरात विरोधकांच्या घोषणा

काय म्हणाले अजित पवार?

“पाच नंबरची लक्षवेधी पुढे का ढकलली? वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलताय? आम्हीही मंत्री होतो. आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाहीये. मंत्र्याचं काम आहे इथे यायचं. जर मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार?” असा संतप्त सवाल उपस्थित होऊ शकतो.

हेही वाचा: Maharashtra : मेडिकल कॉलेज परिसरात विषबाधा; १०० हून अधिक विद्यार्थी आजारी; कँटीनमध्ये...

एक वेळ आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. त्यांना जास्तीची कामं असतात. दुसरे लोक उत्तरं देतात. आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले सभागृहात. सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्हीही कुणी यावर काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड चाललेत लाड”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

टॅग्स :Ajit Pawar