Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशन कधी घ्यायचं आणि संस्थगित करायचं हे कसं ठरतं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Assembly Winter Session

Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशन कधी घ्यायचं आणि संस्थगित करायचं हे कसं ठरतं ?

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तब्बल तीन वर्षानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे.  या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत,.नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. हे अधिवेशन ३० डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खिर कशी तयार करावी?

अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत मात्र अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मागणी होत आहे की नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा. खरंच अधिवेशनाचा कालावधी वाढवता येतो का ? अधिवेशन कुठे भरवावे आणि कधी संस्थगित करावे हे कसं ठरतं ? वाचा नियम   

हेही वाचा: Paneer Corn Salad : जेवणाच्या थाळीचा स्वाद वाढवेल अशी टेस्टी आणि हेल्दी सॅलड रेसिपी

राज्यपाल स्वतःस योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी बैठक भरविण्यासाठी राज्य विधानमंडळाच्या सभागृहास किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करतात. परंतु एका अधिवेशनातील शेवटची बैठक व आगामी अधिवेशनातील पहिल्या बैठकीसाठी नेमून दिलेली तारीख या दरम्यान सहा महिन्यांचे अंतर पडता कामा नये अशी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४(१) मध्ये तरतूद आहे.

हेही वाचा: Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेची खालीलप्रमाणे वर्षातून सर्वसाधारण तीन अधिवेशने होतात.

(१) पहिले अधिवेशन अर्थकसंल्पीय अधिवेशन फेब्रुवारी-मार्च दरम्यान,

(२) दुसरे अधिवेशन पावसाळी अधिवेशन जून-जुलै-ऑगस्ट दरम्यान,

(३) तिसरे अधिवेशन हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान,

हेही वाचा: Maharashtra Karnataka Border : या पहिलवानाने स्वीकारलेलं बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं हौताम्य

संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात यावा म्हणून झालेल्या "नागपूर करारातील तरतुदीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्यावेळी घेतलेल्या निर्णयानुसार दोन्ही सभागृहांचे एक अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे आयोजित करण्यात येते व सर्वसाधारणपणे ते हिवाळी अधिवेशन असते. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात " वंदे मातरम " या गीताने होते. तसेच प्रत्येक अधिवेशनाचा समारोप " जन गण मन या राष्ट्रगीताने होतो.

हेही वाचा: Somnath Temple : सोमनाथ मंदिरात आहे असा एक रत्न ज्याच्या स्पर्शाने दगड सुद्धा सोन्यात बदलतो

संविधानाच्या अनुच्छेद १७४ अन्वये विधानसभेच्या अधिवेशनाचा दिनांक, वेळ व स्थळ सूचित करणारा राज्यपालांचा आदेश संसदीय कार्य विभागामार्फत या सचिवालयास प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार रीतसर आवाहनपत्र (समन्स), अधिवेशनाची दिनदर्शिका तसेच अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाची कार्यावली सदस्यांना पाठविण्यात येते. तसेच, कामकाजाची अंतिम कार्यावली देखील सदस्यांना नंतर पाठविण्यात येते.

हेही वाचा: Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

३. अधिवेशन संस्थगित करणे व पुढील अधिवेशनासंबंधी घोषणा :-

अधिवेशनाची तारीख आगाऊ घोषित करण्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आपल्या राज्यात असून प्रत्येक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येते. त्याप्रमाणे संविधानाच्या अनुच्छेद १७४ (२) (क) अन्वये राज्यपालांना, विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित करण्याचा अधिकार आहे. हा आदेश सर्वसाधारणपणे, अधिवेशनाच्या शेवटी पीठासीन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतो आणि पीठासीन अधिकारी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनाचा समारोप करताना विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर करतात.