प्रकाश आंबेडकरांकडून बंद मागे; बंद यशस्वी झाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रभर पुकारलेला बंद मागे घेतला असल्याचे सांगितले आहे. हा बंद यशस्वीही झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंबडेकर म्हणाले, 'आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही. घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्याने ती दगडफेक केलेली नाही. दगडफेक करणारा चेहरा झाकून आला होता. दगडफेक केल्यानंतर तो पळून गेला. चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही हे आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सांगितले होते. बजरंग दल आणि भाजपाने या बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केला असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

तत्पूर्वी, सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुंबईत दादरमध्ये कपडा बाजार आहे. जिथे दररोज काहीशे कोटींचा व्यवहार होतो पण आज ५० कोटींचा सुद्धा व्यवहार झालेला नाही असे सांगताना त्यांनी मुंबईतही बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh against NRC and CAA is Sucessful says Prakash Ambedkar