esakal | 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

sakal_logo
By
सुधीर काकडे

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर संबंध देशात राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळता आहेत. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेचा देशातील सर्व विरोधी पक्षांनी निषेध केला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या बंदला विरोध दर्शवला आहे.

भाजपने या प्रकरणावर महाविकास आघाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. 'महाराष्ट्रातील शेतकरी पाऊस, पूर आणि दुष्काळाने त्रस्त झाले आहेत, त्यांच्यासाठी कोणतीही पावले न उचलता, फक्त उत्तर प्रदेशातील घटनेबद्दल बोलत असून हे संधीसाधू आहेत' अशी टीका केली.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी बंद पुकारला आहे. तर इतर काही पक्ष आणि संघटनांनी देखील या बंदला समर्थन दिले आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाने या बंदच्या विरोधात भूमिका घेतल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लखीमपूरच्या घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा महाविकास आघाडी करत आहे. भाजप या बंदला प्राण पणाने विरोध करेल. सरकारी दडपशाही करुन मुंबईकरांना व्यवहार बंद करायला लावले तर भाजर रस्त्यावर उतरून उत्तर देईल असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकरांनी यांनी दिला आहे. तसेच या बंदमध्ये जे लोक दुकानं सुरू ठेवतील त्या लोकांना भारतीय जनता पक्ष संरक्षण देईल असे देखील त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top