
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज, 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32 टक्के गुणांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले, तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 82.67 टक्के इतका सर्वात कमी राहिला. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील 49 शाळांचा निकाल शून्य टक्के राहिला आहे. याशिवाय, 285 विद्यार्थ्यांना केवळ 35 टक्के गुण मिळाले, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.