esakal | अर्थसंकल्प थोडक्यात आणि सोप्या शब्दांत; वाचा ठळक वैशिष्ट्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

कोरोनाच्या महासाथीने जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभे केल्याने सर्वांनीच त्यातून धडा घेण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने या अर्थसंकल्पात कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेची पायाभूत सुविधा मजबूत व्हावी यासाठी सात हजार ५०० कोटी रुपयांची भरभक्कम तरतूद केली आहे.

अर्थसंकल्प थोडक्यात आणि सोप्या शब्दांत; वाचा ठळक वैशिष्ट्ये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या महासाथीने जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभे केल्याने सर्वांनीच त्यातून धडा घेण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने या अर्थसंकल्पात कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेची पायाभूत सुविधा मजबूत व्हावी यासाठी सात हजार ५०० कोटी रुपयांची भरभक्कम तरतूद केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

 • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्त्वावर इयत्ता सहावीपासून सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम
 • दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल, असे वेब ॲप्लिकेशन तयार करणार
 • तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना
 • स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन दहा रुपये आकारुन तेवढाचा निधी सरकारकडून देणार 

आदिवासी विकास 

 • राज्यातील १०० शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर 
 • रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे पथदर्शी तत्त्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत

इतर मागास बहुजन कल्याण 

 • महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपये, श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपये, श्‍यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास ५० कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास १०० कोटी रुपये, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला १०० कोटी रुपये, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास २०० कोटी रुपये एवढा निधी देणार
 • विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(ड), विशेष मागास प्रवर्ग 
 • आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविणार
 • औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तीन हजार ४८७ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित

तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारके 

 • परळी वैजनाथ (जि.बीड), औंढा नागनाथ (जि.हिंगोली), त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक), भीमाशंकर (जि.पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता विशेष निधी
 • जेजुरी गड, बिरदेव देवस्थान, निरा नृसिंहपूर (सर्व जि.पुणे), आरेवाडी (जि.सांगली) या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांसाठीही निधी देणार
 • मोझरी आणि कौंडण्यपूर (जि.अमरावती), संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगाव (ता.जि.अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरीता निधी येणार
 • सप्तश्रृंगी गड (जि.नाशिक), संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक), भगवानगड (जि. नगर), नारायण गड आणि गहिनीनाथ गड (जि.बीड) या तीर्थक्षेत्रांसाठी निधी
 • मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली तसेच सिद्धटेक यांच्या विकासासाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करणार
 • संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान नरसी नामदेव (जि.हिंगोली) या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी देणार
 • संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा (जि.सोलापूर) येथे स्मारक उभे करण्यासाठी २०२१-२२ मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करणार 
 • श्री क्षेत्र पोहरादेवी (जि.वाशिम) विकास आराखड्याची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

उद्योग, ऊर्जा व कामगार 

 • ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी २५ हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दिष्ट
 • एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिक कारागीर, मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी साहाय्य करून  त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार
 • नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करणार

रेल्वे विकास

 • पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास मान्यता. प्रस्तावित लांबी २३५ किलोमीटर, वेग २०० किलोमीटर प्रतितास, अपेक्षित खर्च १६ हजार ३९ कोटी रुपये
 • राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसगाड्यांचे सीएनजी व विद्युत बसमध्ये रूपांतर व बसस्थानकांचे आधुनिकीकरणासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित     

मनुष्यबळ विकास

 • शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरिता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार
 • प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’ स्थापन करण्याचा निर्णय. एकूण ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित.
 • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करणार. दोन लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.
 • सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘शिवराज्य सुंदर ग्राम’ मोहीम राबविण्यात येणार. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार.

कामगार

 • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी ‘समर्पित कल्याण निधी’. बीजभांडवल २५० कोटी रुपये
 • जव्हार येथे गिरिस्थान पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार 
 • वरळी दुग्धशाळेच्या १४ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी  जागा हस्तांतराची प्रक्रिया  व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू
 • पुण्यातील साखर संकुलात सुमारे ४० कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारणे प्रस्तावित 
 • राज्यातील धूतपापेश्वर मंदिर (जि.रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर  (जि.कोल्हापूर), एकवीरा माता मंदिर, कार्ले (जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (जि.नाशिक), खंडोबा मंदिर, सातारा ( जि.औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (जि.बीड), आनंदेश्वर मंदिर, लासूर (जि.अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी १०१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित.

अन्य तरतुदी

 • बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये दहा कोटी रुपयांची भर
 • राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांचा कायापालट करण्यासाठी ‘सुंदर माझे कार्यालय’ मोहीम राबविणार. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांना पुरस्कार देणार
 • जिल्हा वार्षिक योजनेसाठी ११ हजार ३५ कोटी रुपये तरतूद उपलब्ध होणार 
 • कार्यक्रम खर्चाची रक्कम एक लाख ३० हजार कोटी रुपये एवढी निश्चित. त्यामध्ये अनुसूचीत जाती उपयोजनेच्या दहा हजार ६३५ कोटी रुपये व आदिवासी विकास उपयोजनेच्या नऊ हजार ७३८ कोटी  रुपये खर्चाचा समावेश. 
 • अर्थसंकल्पात महसूली जमा तीन लाख ४७ हजार ४५७ कोटी रुपये अपेक्षित. 
 • यावर्षी केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या राज्य हिश्श्याच्या कराच्या रकमेत १४ हजार ३६६ कोटी रुपये घट 
 • महसूली जमेचे सुधारीत उद्दिष्ट दोन लाख ८९ हजार ४९८ कोटी रुपये निश्चित.
 • एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ४ लाख ४ हजार ३८५ कोटी रुपये, सुधारीत अंदाज ३ लाख ७९ हजार ५०४ कोटी रुपये
 • अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रुपये व महसुली खर्च तीन लाख ७९ हजार २१३ कोटी रुपये अंदाजित. दहा हजार २२६ कोटी रुपये महसूली तूट
 • अर्थव्यवस्थेला गती देणे व रोजगार निर्मितीसाठी मूलभूत बाबीवर खर्च करण्यासाठी ५८ हजार ७४८ कोटी रुपये तरतूद
 • राजकोषीय तूट ६६ हजार ६४१ कोटी रुपये
 • मदत व पुनर्वसन विभागास ११ हजार ४५४ कोटी ७८ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित 
 • अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

आरोग्यसेवा

 • आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी सात हजार ५०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करणार
 • महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करणार. त्यापैकी ८०० कोटी रुपये यावर्षी देणार
 • कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात १५० रुग्णालयांमध्ये सुविधा.
 • सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. 
 • अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ११ शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रूपांतर
 • सतरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयांची स्थापना
 • जिल्हा रुग्णालयांमध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनापश्‍चात सल्ला व उपचार केंद्र उभारणार
 • सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आठ हजार ९५५ कोटी २९ लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी एक हजार ९४१ कोटी ६४ लाख रुपये तरतूद.

कृषी विकास

 • तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा 
 • कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित 
 • शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कंपनीला दरवर्षी एक हजार ५०० कोटी रुपये निधी भागभांडवल
 • थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी, ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के, ३० हजार ४११ कोटी रुपये रक्कम माफ
 • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण दोन हजार १०० कोटी रुपये अंदाजित किमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प 
 • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.
 • चार कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या तीन वर्षांत ६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार
 • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा  कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टसाठी अनुदान
 • कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास तीन हजार २७४ कोटी रुपये खर्च

महिला व बालविकास

 • राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजने अंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.
 • ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
 • सरकारकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करणार
 • महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या तीन टक्के खर्च राखून ठेवण्याचा निर्णय
 • राज्य राखीव पोलिस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करणार

मुद्रांक शुल्कात सवलत  

 • महिलांच्या लाभात होणाऱ्या घराचे अभिहस्तांतर किंवा विक्री करारपत्राचे दस्त नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात प्रचलित दरातून एक टक्का सवलत देण्याचा प्रस्ताव

मदत व पुनर्वसन

 • मदत व पुनर्वसन विभागास ११ हजार ४५४ कोटी ७८ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित 
 • अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर 

रस्ते विकास

 • नांदेड ते जालना या  २०० किलोमीटर लांबीचे सात हजार कोटी रुपये अंदाजित रकमेचे द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम
 • पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, १७० किलोमीटर लांबीच्या २६ हजार कोटी रुपये अंदाजित किंमत
 • रायगड जिल्ह्यातील रेवस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ५४०  किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी नऊ हजार ५७३ कोटी खर्च अपेक्षित 
 • ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची ४० हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. दहा हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी करणार. यासाठी एक हजार ७०० कोटी रुपयाची तरतूद       

ग्रामविकास   

 • प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनांसाठी सहा हजार ८२९ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध करणार

मेट्रो प्रकल्प व विमानतळांना प्राधान्य 

 • महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्प व  राज्यातील प्रमुख शहरातील विमानतळांना प्राधान्य दिले आहे. 

राज्यातील मेट्रो प्रकल्प 

 • नागपूर शहर, वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेड ही शहरे नागपूर मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन हा २६९ किलोमीटर लांबीचा प्रकल्प
 • नाशिक शहरामध्ये ३३ किलोमीटर लांबीचा २ हजार १०० कोटी रुपये किमतीचा ‘नाशिक मेट्रो निओ प्रकल्प’
 • ठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारित ७ हजार१६५ कोटी खर्चाचा वर्तुळाकार प्रकल्प
 • पिंपरी चिंचवड ते निगडी मार्गिका क्रमांक १ हा ९४६ कोटी ७३ लाख रुपये किमतीचा प्रकल्प
 • याशिवाय राज्यात नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर येथील इतवारी ते नागभीड या रेल्वेमार्गांची कामे वेगाने सुरू 

विमान वाहतूक क्षेत्र 

 • शिर्डी विमानतळावरील नवीन हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, रात्रीच्या उड्डाणाची सुविधा तसेच प्रवासी सेवांची कामे सुरू आहेत. 
 • अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल इमारत तसेच रात्रीच्या विमानवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे प्रगतिपथावर 
 • सोलापूर शहराजवळ बोरामणी येथे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करणार. या विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 
 • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवा सुरु करण्याची बाब अखेरच्या टप्प्यात
 • पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता. या कामाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर  
 • शिवणी,अकोला येथे मोठया विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टी वाढविणे व इतर कामांसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू  
 • उजळाईवाडी, कोल्हापूर येथील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे तसेच रात्रीच्या उड्डाणासाठीची कामेही प्रगतिपथावर

क्रीडा

 • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार, त्यासाठी चारशे कोटींची तरतूद

Edited By - Prashant Patil

loading image