
Budget Session 2023 : सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर शिंदे सरकारला जाग; तात्काळ सुधारला हिरकणी कक्ष
आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन विधानभवनात अधिवेशनासाठी आल्या होत्या. या वेळी मुंबई विधान भवनामध्ये आपल्या बाळाला ठेवण्यासाठी हिरकणी कक्षाची चांगली व्यवस्था नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. राज्य सरकारने लगेचच या तक्रारीची दखल घेत हिरकणी कक्ष सुधारला आहे.
हिरकणी कक्ष आता साफ करण्यात आला असून तिथे पलंगाची सोय करण्यात आली आहे. शिवाय सोफा आणि पाळणाही बसवण्यात आला आहे. तसंच काही खेळणीही या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. आमदार सरोज अहिरे यांनी सरकारच्या या कृतीचं स्वागत केलं आहे
हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
माध्यमांशी बोलताना सरोज अहिरे म्हणाल्या, "माझ्या तक्रारी ची दखल राज्य सरकारने घेतली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानते. माझ्या प्रमाणे इतर महिलांसाठी हिरकणी कक्ष उभे करावे, अशी अपेक्षा. तेरा हुवा मेरा कब होगा असं सध्या आहे. सर्वच महिला वर्गासाठी हिरकणी कक्ष उभे करावे ,अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी आठ मार्चला महिला दिवस आहे त्या दिवशी केली तर बरं होईल.
अहिरे पुढे म्हणाल्या, "माझं बाळ अंगावर पीत असल्याने त्यामुळे मी त्याला इथे घेऊन आले पण सुविधा नसल्याने समस्या येत होत्या. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष घातलं त्याबद्दल आभार व्यक्त करते हिरकणी कक्षात पलंग दिलाय ,सोफा व पाळणाही दिलाय, चांगली सोय केलीय. पण हा विषय माझा विषय होता तो सुटला. पण अनेक महिला काम करत असताना हा प्रश्न उपस्थित होतो तो लोकप्रतिनिधींनी सोडवावा. महिलांचं दुःख काय असतं हे मला कळतंय त्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. इतर महिलांची सोय कधी राज्यसरकार करणार याकडे लक्ष आहे"