

राज्याच्या अर्थसंकल्पात विविध धोरणांची नव्याने मुहूर्तमेढ करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण २०२५, अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स ॲन्ड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण आणि केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.