Maharashtra Budget 2025 : शेतकरी कर्जमाफीला सरकारचा शेतकऱ्यांशी निगडित योजनांना ‘ठेंगा’

भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात कर्जमाफी करण्यासह शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ, ‘एमएसपी’शी समन्वय साधत २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना, खतांवरील राज्य वस्तू व सेवा कर परतावा अनुदान आदी योजनांची आश्वासने हवेत विरली आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी निगडित योजनांना ठेंगा दाखविल्याने विरोधकांसह शेतकरी नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

पवार यांनी अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी (कार्यक्रम खर्चाकरिता) एकूण ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र हे करत असताना, यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील दुसऱ्या टप्प्यासाठी ३५१ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यातील एरवी पुरवणी मागण्यांमधून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या ६,०६० कोटी रुपयांचा समावेश करून, अर्थसंकल्पी तरतुदीचा आकडा फुगविण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात कर्जमाफी करण्यासह शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतमालाला वाजवी भाव मिळण्यासाठी आणि नगदी पिकांसाठी नव्याने लागवड व पणन योजना, सौर पॅनेल आच्छादित शेतीला प्रोत्साहन अनुदान, मका व बांबू आधारित इथेनॉल केंद्र आदी योजनांचा सरकारला विसर पडला असल्याचे अर्थसंकल्पात समावेश केला नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सांडपाणी प्रकल्पासाठी तरतूद

दरम्यान, राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्‍या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ हजार २०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राज्य सरकार हाती घेणार आहे. तसेच बांबू लागवडीसाठी ४ हजार ३०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार येथील गोविज्ञान केंद्रास अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

कृषीसाठी केलेल्या तरतुदी आणि योजना

  • म्हैसाळ उपसा सिंचनच्या २०० मेगावॉट क्षमतेच्या १ हजार ५९४ कोटी रुपये किमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता

  • नैसर्गिक शेती अभियानासाठी २५५ कोटी रुपये

  • नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी ८ हजार २०० कोटी

  • बांबू लागवडीसाठी ४ हजार ३०० कोटी

  • बाजार समिती नसलेल्या तालुक्यात बाजार समिती

  • बळीराजा शेती व पाणंद रस्ते योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com