‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्र’ या सूत्रानुसार विकासचक्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार असून उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्र, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी
उद्योग विकास
नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार
मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करणार. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर, तर २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
गडचिरोली जिल्हा ‘स्टील हब’ म्हणून उदयास येणार. खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद.
सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत
६ हजार ४०० कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान
कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत
नागपूर येथे ‘अर्बन हाट केंद्र’
नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर-इनोव्हेशन सिटी
पायाभूत सुविधा विकास
महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ८ हजार ४०० कोटी रुपये किमतीचा बाह्यसहाय्यित शोअर प्रकल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे १५८ कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता
अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ तयार करणार
अंतर्गत ७५५ किलोमीटर रस्ते लांबीची ६ हजार ५८९ कोटी रुपये किंमतीची २३ कामे हाती घेणार.
सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत ३६ हजार ९६४ कोटी रुपये किमतीची ६ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३, २०२५-२६ साठी १५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३, एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ३,५८२ गावांना १४ हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार.
स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे, २०२८ पर्यंत पूर्ण करणार. उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार ५१५ कोटी रुपये किमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार. तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग- ६ हजार ४९९ कोटी रुपये
खर्च अपेक्षित
येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार. येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात ४३.८० किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात येणार
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण
शिर्डी विमानतळाच्या १ हजार ३६७ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता.
अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण - ३१ मार्च २०२५ पासून प्रवासी सेवा सुरु करणार
रत्नागिरी विमानतळाची १४७ कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर
गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु
अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
कृषि व संलग्न क्षेत्रे
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची ५ हजार ३६ कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ८१८ गावांमध्ये ४ हजार २२७ कोटी रुपये किंमतीची एकूण १ लाख ४८ हजार ८८८ कामे हाती घेणार.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता.अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये -लाभक्षेत्र ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ-प्रकल्पाची अंदाजित किंमत ७ हजार ५०० कोटी रुपये.
दमणगंगा -एकदरे -गोदावरी या २ हजार ३०० कोटी रुपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार
तापी महापुनर्भरण हा १९ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ
उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार.
सांगली जिल्ह्यातील २०० मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना-१ हजार ५९४ कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
३८ उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार - २.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ९० हजार रोजगार निर्मिती
बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ४ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार
२१०० कोटी रुपये किमतीचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविणार
सामाजिक क्षेत्र
ग्रामीण टप्पा - २ अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार,प्रधानमंत्री आवास योजना - शहरीसाठी ८ हजार १०० कोटी रुपयांचा निधी,पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन - ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार
जलजीवन मिशन योजनेसाठी
२०२५-२६ मध्ये या योजनेकरीता ३ हजार ९३९ कोटी रुपये नियतव्यय
गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे ३७ हजार ६६८ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प राबविणार
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, टप्पा-२ साठी २०२५-२६ मध्ये त्यासाठी १ हजार ४८४ कोटी रुपये नियतव्यय
ठाणे येथे २०० खाटांचे, रत्नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय, रायगड जिल्ह्यात २०० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारणार
धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर एकूण २२ कल्याणकारी योजना राबविणार
दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान १ टक्के निधी राखीव
प्रत्येक जिल्ह्यात एक ‘उमेद मॉल’ उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी देणार
शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करणार
क्रीडा संकुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान १ टक्का निधी राखीव
पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार
सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करणार
राज्यात १८ नवीन न्यायालयांची स्थापना
पर्यटन व स्मारकांसाठी विशेष तरतूद
पर्यटन धोरण-२०२४ च्या माध्यमातून १० वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
चैत्यभूमी दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकासाठी पुरेसा निधी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारणार
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २२० कोटी रुपयांचा निधी
आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जि. सातारा) येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील स्मारकासाठी पुरेसा निधी
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘नमामि गोदावरी’ अभियानाचा आराखडा तयार, कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना
नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी १४६ कोटी १० लाख रुपये
दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे ४५ ठिकाणे रोप-वेव्दारे जोडण्यात येणार
महानुभव पंथाच्या श्रद्धास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार
रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरण, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.