"मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर उपमुख्यमंत्री उत्तर देतात"; आदित्य ठाकरेंनी दिला 'हा' इशारा : Maha Budget Session 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aditya thackerays security increased stones pelleted on convoy in aurangabad ambadas danve allegations on  shinde govt

Maha Budget Session 2023: "मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर उपमुख्यमंत्री उत्तर देतात"; आदित्य ठाकरेंनी दिला 'हा' इशारा

मुंबई : आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सभागृहात प्रश्न विचारल्यानंतर योग्य प्रकारे उत्तर मिळत नाहीत, अशी तक्रार करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशाराच दिला आहे. (Maharashtra Budget Session 2023 We asked questions to CM but Dy CM stands for answer Aditya Thackeray gave warning)

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर त्यांनीच त्याचं उत्तर देण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी जागेवरुन उठले. जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असा थेट इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसंही त्यांना माहितीए की त्यांचं सरकार हे घटनाविरोधी सरकार आहे आणि हे सरकार नक्कीच पडणार आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार आहे, लोकांचं नाही. २६३ कोटींची योजना असून त्याविरोधात सीपीडी विभागानं निविदा काढल्या आहेत. मुंबई महापालिका सध्या मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे चालवली जात आहे. हे सरकार अनेक घोटाळे करत आहे, हे घोटाळे लोकांसमोर आले पाहिजेत, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

दरम्यान, 3 ते 6 महिन्यांत आम्ही बीएमसीचे विविध घोटाळे बाहेर काढले आहे. आता सरकारचा आणखी एक घोटाळा आम्ही समोर आणत आहोत. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत, निवडणूक घेण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला.