Viral Video : घे डबल! आमदारांची 'तंबाखूची मळामळी'! मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात बोलत असताना काही आमदार मागे नेमक्या कोणत्या तलफीत होते असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.
Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023 esakal

Maharashtra Budget Session 2023 Shambhuraj desai : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात बोलत असताना काही आमदार मागे नेमक्या कोणत्या तलफीत होते असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मंत्री शंभुराज देसाई यांनी त्या व्हिडिओवर आता प्रतिक्रिया दिली असून मी कुणाला काही दिलेले नाही. तो कागद देखील असू शकतो. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं काय ते मी सांगू शकेल अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये देसाई हे त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दुसऱ्या एका आमदाराला पुडी देताना दिसून आले आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यापूर्वी ज्या आमदारानं देसाई यांच्याकडे पुडीची मागणी केली होती त्यांनी तंबाखू मळण्याची खूण करुन त्यांच्याकडे पुडी मागितली. या देवाण-घेवाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया कमालीच्या संतापाच्या आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात आहात की तंबाखू मळण्यासाठी अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Maharashtra Budget Session 2023
Rahul Gandhi: राहुल गांधींची खासदारकी रद्द होणार? कपिल सिब्बल यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...

नेटकऱ्यांनी, नागरिकांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. जे काही सुरु आहे ते पाहता आपण आमदारांकडून शिस्तभंग झाल्याचे दिसून आल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Maharashtra Budget Session 2023
Rahul Gandhi : 'आरंभ है प्रचंड!' खासदारकी गमावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com