

Maharashtra Budget Session Begins Amid Opposition Boycott, 6 Key Issues Take Center Stage
esakal
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यापूर्वीच विरोधकांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी पक्षाच्या चहापान कार्यक्रमावर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी या परिषदेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील उपस्थित होते. या परिषदेनंतर अधिवेशनात कोणते मुद्दे तापणार याची स्पष्ट कल्पना आली आहे.