
Maharashtra Cabinet : एकनाथ शिंदे नवी टीम तयार करणार; वाचाळवीरांना मिळणार शिक्षा
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने लोटले पण तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. यावर्षी तरी हा विस्तार होण्याची चिन्हं दिसत नाही. अशातच आता एकनाथ शिंदे आपली नवी टीम तयार करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा: Ajit Pawar: अजित पवारांना दिलासा! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आयकर विभागाचा मोठा निर्णय
शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यामध्ये १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यातले ९ मंत्री शिंदे गटातले तर ९ भाजपातले आहेत. मात्र उर्वरित विस्तार अजूनही झालेला नाही. हा विस्तार निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येणार आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
मात्र या वेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचं भविष्यासाठी नवी टीम तयार करण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे ही संधी देण्यात येणार आहे. तसंच पुन्हा ठाकरे गटात जाण्याची धमकी देणाऱ्या आमदारांना मात्र मंत्रिपद देण्यात येणार नाही. तसंच वाचाळवीरांनाही मंत्रिपदापासून लांबच ठेवण्यात येणार आहे.