
Maharashtra Assembly Winter Session: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांकडे खातेवाटपाची अंतिम यादी सादर करतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मंत्र्यांचा शपथविधी १५ डिसेंबरला झाला असला तरी खातेवाटपाची प्रक्रिया विलंबाने सुरू होती.